अभिनेत्री जिया खान आत्महत्येप्रकरणी अभिनेता सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता
मुंबई , दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वयाच्या 18 व्या वर्षी राम गोपाल वर्मा यांच्या ‘निशब्द’ या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री जिया खान हिच्या आत्महत्ये प्रकरणी 10 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर विशेष सीबीआय न्यायालयाने अभिनेता सूरज पांचोलीची पुराव्यांअभवी निर्दोष मुक्तता करण्यात आली.3 जून 2013 रोजी जिया खानने मुंबईतील जुहू येथील तिच्या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली. पोलिसांना जिया खानच्या घरातून सहा पानांची सुसाईड नोट सापडली. या सुसाईड नोटमध्ये सूरज पांचोलीवर बॉलिवूड अभिनेत्री जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास आधी मुंबई पोलीस करत होते आणि त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.या प्रकरणात मुख्य साक्षीदार असलेली जियाची आई राबिया खान यांनी जियाची आत्महत्या नसून हा एक हत्येचा असल्याचा आरोप आहे.गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाने याचा पुन्हा तपास करण्याची मागणी फेटाळून लावली होतीमुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस. सय्यद यांच्या न्यायालयाने 20 एप्रिल रोजी या प्रकरणातील सुनावणी पूर्ण केली.यानंतर यासंदर्भातील निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे. आज सकाळी 10.30 वाजता या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला.पुराव्यांअभवी हे न्यायालय सूरज पांचोलीला दोषी ठरवू शकत नाही, त्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, असे विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस. सय्यद म्हणाले. दरम्यान कोर्टानं जियाची आई राबिया खान यांना या निकालाल आव्हान देण्याची मुभा मात्र कायम ठेवली आहे.
ML/KA/PGB 28 APR 2023