जितेंद्र आव्हाड जामिनावर मुक्त

 जितेंद्र आव्हाड जामिनावर मुक्त

ठाणे दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाण्याच्या चित्रपटगृहात एका चित्रपटाचा खेळ बंद करून त्यातील एका प्रेक्षकाला मारहाण करण्या प्रकरणी काल पासून अटकेत असलेल्या माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या अकरा सहकाऱ्यांना आज ठाणे न्यायालयाने जामिनावर मुक्त केले आहे. Jitendra Awhad is free on bail

ठाण्याच्या विवीयाना मॉलमध्ये हर हर महादेव या चित्रपटातील काही दृष्याना आक्षेप घेत आव्हाड यांनी आपल्या समर्थकांसह या चित्रपटाचा खेळ बंद पाडला होता, यावेळी झालेल्या गोंधळात एका प्रेक्षकाला मारहाण ही झाली होती. हा प्रेक्षक मनसे चा कार्यकर्ता होता.

याला प्रत्युत्तर देताना मनसे ने आव्हाड यांना आव्हान देत तिथेच तो चित्रपट प्रेक्षकांना मोफत दाखवला होता. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात काल आव्हाड यांना वर्तक नगर पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली होती.

त्यांना अटक झाल्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर गर्दी करून निदर्शने केली, मात्र आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले, तिथे त्यांची सात दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली मात्र न्यायालयाने त्यांच्यासह एकूण बारा जणांना प्रत्येकी पंधरा हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला.

ML/KA/SL

12 Nov. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *