जितेंद्र आव्हाड यांना अटक
ठाणे, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आज दुपारी पोलिसांनी अटक केली, विवियाना मॉल मध्ये चित्रपट शो बंद पाडून प्रेक्षकाला मारहाण करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे.Jitendra Awad arrested
हर हर महादेव या चित्रपटातील काही दृष्यांवर आक्षेप घेत आव्हाड यांनी आपल्या समर्थकांसह चार दिवसांपूर्वी ठाण्यातील विवियना मॉल मध्ये जाऊन चित्रपटाचा खेळ बंद पाडला होता, यावेळी एका प्रेक्षकाशी कार्यकर्त्यांशी बाचाबाची होऊन त्यात त्या प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी आव्हाड आणि त्यांच्या शंभर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणी नंतर मनसे ने विरोधी भूमिका घेत त्यादिवशी तो शो पुन्हा सुरू करण्यास भाग पाडले होते आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच चित्रपटाचा खेळ प्रेक्षकांना मोफत दाखवला होता.
आज दुपारी या प्रकरणी पोलिसांनी आव्हाड यांना अटक केली असून सायंकाळी उशिरा पर्यंत त्यांना जामीन झाला नव्हता.
ML/KA/PGB
11 Nov .2022