जगातील सर्वांत उंच युद्धभूमीवर पोहोचले Jio चे 5G नेटवर्क

नवी दिल्ली,दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रिलायन्स Jio अल्पावधितच देशातील बहुतेक ठिकाणी आधी 4G आणि आता 5G सेवा सुरू केली आहे. विशेष म्हणजे, आता कंपनीने जगातील सर्वात उंच्च युद्धक्षेत्रात आपली 5G सेवा सुरू केली आहे. रिलायन्सजिओ आणि भारतीय सैन्याने एकत्रितपणे जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन ग्लेशियरवर पहिला 5G मोबाइल टॉवर यशस्वीरित्या स्थापित केला आहे.
एवढ्या उंचीवर टॉवर उभारणे अत्यंत अवघड होते. लष्कराने लॉजिस्टिकसह क्रू मेंबर्सची सुरक्षा सुनिश्चित केली. त्यामुळे जिओने त्याचे स्वदेशी फुल-स्टॅक 5G तंत्रज्ञान वापरले. फायर अँड फ्युरी सिग्नलर्स आणि सियाचीन वॉरियर्सने जिओ टीमसह उत्तर ग्लेशियरमध्ये 5G टॉवर स्थापित केले. विशेष म्हणजे, या भागातील तापमान -40 डिग्री सेल्सियस पर्यंत घसरते. थंड वारे आणि बर्फाचे वादळे येथे वारंवार येतात. अशा परिस्थितीत या टॉवर उभारणीचे काम पूर्ण केले.
भारतीय लष्कराच्या ‘फायर अँड फ्युरी’ कॉप्सने ‘एक्स’वर ही माहिती दिली. लष्कराच्या म्हणण्यानुसार, Jioआणि भारतीय लष्कराने एकत्रितपणे सियाचीन ग्लेशियरवर हा पहिला 5G मोबाइल टॉवर यशस्वीरित्या स्थापित केला आहे. सियाचीनमधील फॉरवर्ड पोस्टवर हा टॉवर तैनात करण्यात आला आहे. 15 जानेवारीला आर्मी डेच्या आधी सियाचीन ग्लेशियरवर 4G आणि 5G सेवा सुरू करून Jio ने ही अभूतपूर्व कामगिरी केली आहे. सियाचीन ग्लेशियरवर सेवा सुरू करणारी जिओ देशातील पहिली ऑपरेटर ठरली आहे.
SL/Ml/SL
13 Jan. 2025