25 टक्यांनी महागले Jio चे रिचार्ज प्लॅन

 25 टक्यांनी महागले Jio चे रिचार्ज प्लॅन

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सुरुवातीला फुकट सिमकार्ड्स वाटून गेली काही वर्षे ग्राहकांना स्वस्त रिचार्ज प्लॅन्स देऊन रिलायन्सच्या Jio ने दूरसंचार मार्केटमध्ये जोरदार मुसंडी मारली. त्यानंतर आता आपले व्यावसायिक रंग दाखवत रिलायन्स जिओने त्यांचे अनेक असलेले रिचार्स प्लॅन महाग करुन करोडो यूजर्सना आज मोठा धक्का दिलाय. कंपनीने त्यांच्या असलेल्या एकूण १९ योजनांची यादी सध्या शेअर केली आहे, ज्याच्या किमती आता वाढवल्या जात आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे आतापर्यंत जिओचे प्लान इतर कंपन्यांच्या तुलनेत सर्वात स्वस्त होते पण आता त्यांची किंमत ६०० रुपयांनी वाढवण्यात आलेली आहे. जिओने १७ प्रीपेड आणि दोन पोस्टपेड प्लानच्या किंती वाढवल्या असून नवी किमती येत्या ३ जुलैपासून लागून होतील.

वार्षिक प्लॅन अधिक महाग

जिओ यूजर्ससाठी वार्षिक प्लान ६०० रुपयांपर्यंत महाग झाले आहेत. दररोज २.५GB डेटा देणारा प्लान आता २९९९ रुपयांऐवजी ३,५९९ रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे. त्याच वेळी, ३३६ दिवसांच्या वैधतेसह येणारा १,५९९ रुपयांचा प्लॅन आता ३४० रुपयांनी महाग झाला आहे आणि त्याची किंमत आता १,८९९ रुपये इतकी झाली आहे.

३ महिन्यांचे प्लॅन…

तीन महिन्यांच्या वैधतेसह येणारे चार प्लान महाग झाले आहेत आणि आता ते २०० रुपयांनी वाढवले आहेत. म्हणजेच कमाल वाढ रुपये ३९५, रुपये६६६, रुपये ७१६ आणि रुपये ९९९ असलेले प्लान आता अनुक्रमे रुपये ४७९, रुपये ७९९ आणि रुपये ८५९ तसेच १,१९९ पर्यंत कमी करण्यात आले आहेत.

पोस्टपेड यूजर्ससाठी

२९९ आणि ३९९ रुपयांचे पोस्टपेड प्लान ५० रुपयांनी महागले आहेत. आता ते ३०GB आणि ७५GB डेटा ऑफर करतात. या योजनांवर स्वतंत्रपणे जीएसटी लागू करण्यात येणार आहे.

सध्या निवडलेल्या ५G स्पेक्ट्रमसाठी अलिकडील लिलावात, रिलायन्स जिओ (Jio) आणि एअरटेल तसेच वोडाफोन- आयडिया म्हणजे वीआय यांना कोटींची बोली लावली आणि मोठी गुंतवणूक केली आहे. अशा परिस्थितीत रिलायन्स जिओनंतर आता एअरटेल आणि इतर कंपन्यांचे प्लानही महाग होण्याची शक्यता आहे.

SL/ML/SL

28 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *