व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर झाली जिओ हॉट स्टार या नव्या वाहिनीची सुरूवात

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ‘वायकॉम १८’ आणि ‘स्टार इंडिया’ या दोन मनोरंजन समूहांचे विलीनीकरण पूर्ण झाले होते. या दोन्ही समूहांची व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर ‘जिओहॉटस्टार’ ही नवी ओटीटी वाहिनी शुक्रवारी सुरू झाली आहे. ‘जिओहॉटस्टार’ या वाहिनीवर १९ पेक्षा अधिक भाषांमधील विविध विषय प्रेक्षकांना उपलब्ध होणार आहेत. यात चित्रपट, वेबमालिका यांच्यासह लाईव्ह खेळांचे सामने आणि क्रीडाविषयक विषय आदींचा समावेश आहे. मात्र यासाठी सबस्क्रिप्शन प्लॅन घ्यावा लागणार आहे.