जिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्याचे आदेश…
चंद्रपूर , दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चंद्रपूर चे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करण्याचे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने पोलिसांना दिले आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना आयोगाने हे आदेश दिले आहेत . जिवती तालुक्यातील कुसुंबी या गावातील आदिवासींच्या जमीन प्रकरणात विनोद खोब्रागडे यांनी आयोगाकडे अपिल दाखल केले होते. या प्रकरणात आयोगाने जिल्हाधिकारी यांना १६ फेब्रुवारीला आयोगापुढे हजर राहण्याचे दिले होते आदेश मात्र आयोगापुढे जिल्हाधिकारी स्वतः हजर झाले नाही, त्यांच्या जागी उपजिल्हाधिकारी तृप्ती सूर्यवंशी हजर झाल्या होत्या. त्यामुळे आयोगाने आता जिल्हाधिकाऱ्यांना अटक करून २ मार्च पर्यंत आयोगापुढे सादर करण्याचे पोलीस महासंचालकांना आदेश दिले आहेत.काय आहे प्रकरण पूर्वीच्या माणिकगड आणि आताच्या अल्ट्राटेक सिमेंट उद्योग समूहाने कुसुंबी येथील आदिवासींच्या जमिनींवर ३६ वर्षांपासून अवैध कब्जा केल्याचा या पीडित आदिवासींचा आरोप आहे आणि या प्रकरणात गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे न्यायालयीन लढा सुरू आहे .याच प्रकरणात आता थेट जिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्याचे आदेश आयोगाने दिल्यामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून या आदेशावर पोलीस काय कारवाई करतात ते पाहावं लागेल.
ML/KA/PGB 23 Feb. 2023