डाॅ.लक्ष्मण शिवणेकर यांना जीवन गौरव पुरस्कार

 डाॅ.लक्ष्मण शिवणेकर यांना जीवन गौरव पुरस्कार

पुणे, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यातील साहित्य गौरव संस्थेच्या 14 व्या साहित्य गौरव संमेलनात वर्ल्ड लिटरेचर संस्थेतर्फे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखक साहित्यिक कवी आणि गजलकार डाॅ.लक्ष्मण शिवणेकर यांना 2023 या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

डॉ. शिवणेकर (Ph. D) उच्च विद्याविभूषित असून त्यांना शिक्षण प्रशिक्षण नवोपक्रम, संशोधन, संशोधन मार्गदर्शक व सल्लागार या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांना अनेक स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नुकतेच त्यांना महाकवी कालिदास पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला आहे. महाविद्यालयीन तसेच विद्यापीठीय स्तरावरील पाठ्यपुस्तके, संदर्भ ग्रंथ आणि अध्ययन साहित्याचे लेखन व संपादन केले आहे. नवोपक्रम व संशोधन सृजनात्मक योगदानासठी डॉ. शिवणेकरांना सलग सात वर्षे एनसीईआरटी दिल्ली तर्फे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय प्रशासनिक तसेच व्यवस्थापकीय सेवेचा त्यांना अनुभव आहे. क्रमणा, अतल हे कवितासंग्रह पहाटेचं स्वप्न ही बाल कादंबरिका, गुरुकिल्ली स्मरणशक्तीची हा ग्रंथआणि गजलामृत (गजलसंग्रह) प्रकाशित आहेत. नाट्यलेखन , अभिनय यात त्यांना रुची आहे. अशा या प्रज्ञावंत आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची वर्ल्ड लिटरेचर संस्थेने 2023 च्या जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड केली असून सन्मानित करण्यात येणार आहे.

सदर पुरस्कार पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष- ज्येष्ठ साहित्यिक आणि आंतरराष्ट्रीय विचारवंत डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या
शुभहस्ते शनिवार ५ ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता पुण्यातील स्काऊट ग्राऊंड सभागृह, सदाशिव पेठ येथे प्रदान करण्यात येणार असल्याचे साहित्य गौरव संस्थेच्या कार्याध्यक्ष मंदाताई नाईक यांनी कळविले आहे.

ML/KA/SL

11 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *