जरांगे म्हणाले…. एकदा मुंबईत आलो तर मग माघार नाही

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्या सकाळपर्यंत मराठ्यांच्या सग्या सोयऱ्याना आरक्षण देण्याचा आदेश जारी करा तोवर मुंबईत येणार नाही, हवं तर नवी मुंबईत च थांबतो अशी ग्वाही मनोज जरांगे यांनी सरकारला दिली मात्र एकदा मुंबईत आलो तर मग माघार नाही असा इशाराही दिला आहे.
मराठ्यांना कुणबी आरक्षण द्यावे या मागणीसाठी जरांगे काल रात्री मुंबईच्या वेशीवर म्हणजे खारघर इथल्या सेंट्रल पार्क येथे येऊन थांबले आहेत , आज त्यांची वाशी इथे जाहीर सभा झाली त्यात त्यांनी सगे सोयरे यांची व्याख्या स्पष्ट करणारा आदेश उद्या सकाळी अकरा पर्यंत जारी करा या मागणीसह पाच प्रमुख मागण्या केल्या. असे न झाल्यास मात्र उद्या दुपारी बारा वाजता आम्ही मुंबईत येऊ मग माघार घेणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या सगे सोयऱ्याना शपथपत्र घेऊन कुणबी दाखले द्या , ५४ लाख लाख नोंदी सापडल्या म्हणत आहात मग त्यांना अजून दाखले का दिले नाहीत असा सवाल त्यांनी यावेळी केला. आज माझ्याकडे सरकारचे शिष्टमंडळ येऊन चर्चा करून गेले त्यांनी काढलेला आदेश ही दिला मात्र कोणीही मंत्री मला भेटला नाही असे जरांगे म्हणाले. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांनी दाखल्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करावी असे आवाहनही त्यांनी केले. आम्हाला मुंबईत येण्याची घाई नाही आणि कोणाला त्रास द्यायची इच्छा ही नाही मात्र आमची मागणी स्पष्ट आहे आणि ती पूर्ण झाल्याशिवाय माघार नाही असे जरांगे म्हणाले. Jarange said…. Once you come to Mumbai, there is no turning back
ML/KA/PGB
26 Jan 2024