जरांगे यांनी अखेर उपोषण सोडले
जालना, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षणावर उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचे 17 दिवसापासून सुरू असलेले उपोषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन सोडले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांनी सरबत पिऊन आपल्या उपोषणाची सांगता केली. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, संदीपान भुमरे , आ राजेश टोपे आदी यावेळी उपस्थित होते.
ML/KA/SL
14 Sept. 2023