जरांगे म्हणतात, आम्हाला ओबिसीतूनच आरक्षण हवे, पुन्हा तीव्र आंदोलन

जालना, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आम्ही या आधीही मराठा आरक्षणाचे स्वागतच केले होते. मात्र
कोट्यावधी मराठ्यांची मागणी ओबीसी आरक्षणातूनच हवे अशी आहे. सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा,जे आमहाला हवं आहे ते आम्ही मिळवणारच , उद्या आम्ही आमच्या पुढच्या आंदोलनाची घोषणा करणार आहोत,ओबीसी आरक्षणातच आमचं हक्काचं आरक्षण आहे त्यावर आम्ही ठाम आहोत अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे…
मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवला नसता तर हे आंदोलन 6 महिने चाललं नसतं.सरकार चालवताना त्यांना मर्यादा आहेत तशा आमच्या समाजालाही आहेत. आमची पोरं 20-20 वर्ष शिक्षणात घालवतात. हरकती हा सरकारचा विषय आहे.आमचा शिंदे यांच्यावर विश्वास आहे की ते अजूनही सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करतील. हा हट्ट नाही हा आमचा अधिकार आहे असे त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
आम्हाला घाई गडबड नाही.
तुमचं मनुष्यबळ वाढवा एका रात्रीत हरकती निकाली काढता येतील.उद्या अंतरवालीत दुपारी 12 वाजता मराठा समाजाची बैठक घेऊन उद्याच आम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत. मुख्यमंत्र्यांवर आमचा अजूनही विश्वास आहे त्यांना आम्ही सरकार म्हणून बघतो.आतापर्यंत दिलेला वेळ खूप झाला.निवडणूक आहे तोपर्यंत आरक्षण टिकेल नंतर काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आज दिलेले आरक्षण टिकेल की नाही या लफडयात आम्हाला पडायचे नाही.उद्या आम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत. आजपासून मी सलाईन बंद केली आहे. सगे सोयरे कयद्याबाबत कुणीतरी मुख्यमंत्र्यांना काम करू देत नाहीये. उद्या आंदोलनाची दिशा ठरवली की सगळे उघड होईल असा इशारा त्यांनी दिला.
अन्न आणि पाण्याविना उद्यापासून आंदोलनाची दिशा ठरवणार. तुम्ही कुणाच्यातरी दडपणाखाली येऊन मराठ्याचे नुकसान करू नये,
मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवून मराठा समाजाने 6 महिने वेळ दिला.पण कोट्यवधी संख्येच्या समाजाला वेगळे कायदे पारीत करून वेठीस धरणे बरोबर नाही.महाराष्ट्रातील सगळ्यांनी या बैठकीला यावे. या गोरगरिबांच्या लढाईमुळे हे आरक्षण मिळालं आहे.हे आरक्षण पुन्हा रद्द झालं तर मराठ्यांची पोरं मरतील,आज त्यांनी सगे-सोयरे बाबतीत निर्णय घ्यायला हवा होता.
ज्यासाठी मराठा समाज आक्रोश करतोय त्यांची तुम्ही चेष्टा करताय.ही आमची आडमुठी भूमिका नाही असेही जरांगे म्हणाले.
ML/KA/PGB 20 Feb 2024