जरांगे यांचा आरक्षणाचा लढा आता संघर्ष योद्धा चित्रपटातून.
जालना, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मनोज जरंगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा चित्रपटाच्या चित्रीकरणाला आजपासून सुरुवात झाली आहे . अंतरवाली सराटीतून मराठा आरक्षणाला नव्याने धार मिळाली त्या ठिकाणाहूनच या चित्रपटाच्या चित्रीकरणा आजपासून सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा उभारणारे मनोज जरंगे पाटील यांचे जीवन आणि त्यांनी उभारलेला मराठा आरक्षणाचा लढा येणाऱ्या पिढी साठी मैलाचा दगड ठरावा या साठी या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.
26 एप्रिल 2024 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात मराठी सिने क्षेत्रातील दिग्गज कलाकार मंडळी चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारणार असून साधारण दीड महिना या चित्रपटाचे चित्रीकरण चालणार आहे. खरा संघर्ष काय असतो, जरांगे पाटलांनी हा लढा केव्हा उभारला, त्या साठी त्यांना काय काय करावे लागले, हे सगळे या चित्रपटातून उलगडले जाणार आहे. अंतरवाली सराटीतील आंदोलनानंतर जरंगे पाटलांचा संघर्ष हा राज्यातील, देशातील सर्वांनाच माहीत झाला त्याआधी जरंगे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याआधीच हा चित्रपट चर्चेत आला असल्याचं चित्रपटाचे निर्माते दौलताडे सांगतात.
ML/KA/PGB 19 Jan 2024