नांदेडमध्ये जापनीज मियाझाकी आंब्याचे उत्पादन, एक आंबा १० हजाराला

नांदेड, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील पारंपरिक शेती पद्धतीत आता कालानुरुप बदल होत आहेत. राज्यातील प्रयोगशील उत्साही शेतकरी आता परदेशांतील पिके घेऊन अधिक कमाई करू लागले आहेत. नांदेडमधील भोसी गावात एका तरूण शेतकऱ्याने माळरानावर दहा एकर मध्ये देश, विदेशातील फळांची बाग फुलवली आहे. यंदा प्रथमच विदेशातील झाडांना बहर आला आहे. तर आंबे बाजारात दाखल होत आहे. विशेष म्हणजे जपानच्या मियाझाकी जातीच्या एका आंब्याची किंमत चक्क दहा हजार रुपये आहे. या आंब्याने चांगलाच भाव खाल्याने चर्चेचा विषय ठरत आहे. नंदकिशोर गायकवाड असे शेतकऱ्याचे नाव आहे
नंदकिशोर गायकवाड हे भोकर तालुक्यातील भोसी येथील शेतकरी आहेत. त्यांची १० एकर खडकाळ जमीन आहे. बीए पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली होती. एक अधिकारी बनण्याचं त्यांचं स्वप्न होतं, पाच वेळेस युपीएससी आणि एमपीएससीच्या परिक्षा दिल्या, मात्र यश काही मिळालं नाही. शेवटी माळरानावरील शेतात फळबाग फुलवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शेतीचा नवा पॅटर्न सशस्वी करून नंदकिशोर यांनी परिसरातील शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
SL/ML/SL
19 March 2025