कामगार मंत्री अ‍ॅड. आकाश फुंडकर यांचा जनता दरबार संपन्न

 कामगार मंत्री अ‍ॅड. आकाश फुंडकर यांचा जनता दरबार संपन्न

मुंबई, दि 4:- राज्याचे कामगार मंत्री अ‍ॅड. आकाश फुंडकर यांचा आज भाजपा प्रदेश कार्यालयात जनता दरबार संपन्न झाला. राज्यभरातील विविध कामगार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या सर्वांच्या समस्या त्यांनी ऐकून घेतल्या व त्यासंबंधी तातडीने बैठका घेऊन समस्या सोडवण्याचे आश्वासन मा.मंत्री महोदयांनी दिले.
तसेच कामगार कायद्याशी संबंधीत विविध विषय देखील त्यांनी या प्रसंगी हाताळले. या प्रसंगी राज्यभरातील सामान्य कामगार आणि भाजपचे कार्यकर्ते आपल्या समस्यांचे निवारण करून घेण्यासाठी या जनता दरबारामध्ये उपस्थित झाले होते . सर्वसामान्य कार्यकर्त्याला आणि कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू अशी भावना या प्रसंगी कामगार मंत्री अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी व्यक्त केली . या जनता दरबारचे आयोजन करण्याचे आदेश दिल्याबद्दल त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस , प्रदेश अध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे , कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले आणि जनता दरबारचे यशस्वी आयोजन करण्यास सहकार्य केल्याबद्दल प्रदेश भाजपा समन्वयक सुधीर देऊळगावकर यांचेही आभार मानले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *