महापालिका ई-विभाग कार्यालय येथील जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि २२
बृहन्मुंबई महानगरपालिका ई विभाग भायखळा येथे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी “जनता दरबाराचे” आयोजन करण्यात आले होते. त्याच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या विविध समस्या, तक्रारी व मागण्या थेट मंत्र्यांसमोर मांडल्या. यावरून मंत्री लोढा यांनी त्वरित समस्या सोडवण्याची आश्वासन दिले तसेच काही समस्यासाठी समोरच्या शासकीय अधिकाऱ्यांना फोन लावून नागरिकांच्या समस्या सोडवण्याची विनंती केली. यावेळी महापालिका प्रशासन, पोलीस अधिकारी, माजी नगरसेविका सुरेखा लोखंडे, भाजपा पदाधिकारी रोहिदास लोखंडे, भाजपा युवा नेते कमलेश डोके आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भायखळा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना दिलासा देणारा हा उपक्रम सकारात्मक लोकसंवादाचे उत्तम उदाहरण ठरला. या जनता दरबार आयोजित केल्याबद्दल स्थानिक लोकांनी मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आभार मानले. KK/ML/MS