राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जनजागर यात्रेला सुरुवात
बुलडाणा, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने जागर यात्रा सुरू असून यात्रेचा दुसरा टप्पा हा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथून राष्ट्रमाता जिजाऊंचा दर्शन सुरू झाली.
महागाई बेरोजगारी विरोधात जनजागृती व्हावी यासाठी मोटारसायकल रॅली काढली. भाजप सरकारच्या काळात महागाई वाढली असून , बेरोजगारी सुद्धा वाढली.. तर सरकार मधील मंत्री स्त्री – पुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करतात.
शेतकरी वर्गात असंतोष पसरला आहे. महिलांची सुरक्षा सुद्धा वाऱ्यावर असल्यानं सरकार बद्दल तीव्र असंतोष नागरिकांत पसरला असून या सरकार विरोधात जनजागृती व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यात जनजागृती केली जात आहे . बुलढाणा येथे आज प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण या सुद्धा या रॅली मध्ये सहभागी झाल्या होत्या.Janjagar Yatra of NCP Mahila Congress begins
ML/KA/PGB
25 Feb. 2023