२०२३ साठीचा जनस्थान पुरस्कार जाहीर

 २०२३ साठीचा जनस्थान पुरस्कार जाहीर

नाशिक,दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठान चा सन २०२३ चा जनस्थान पुरस्कार जाहीर झाला आहे.  या पुरस्काराचे वितरण १० मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता येथील महाकवी कालिदास कलामंदिरात प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते होणार आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने एक वर्षाआड हा पुरस्कार देण्यात येतो.  जनस्थान पुरस्कार हा मराठी साहित्यातील सर्वोच्च पुरस्कारांमध्ये गणला जातो.

आशा बगे यांचा ‘मारवा’ हा कथासंग्रह विशेष प्रसिद्ध आहे, तर ‘भूमी’ आणि ‘त्रिदल’ या कादंबऱ्यांना अनेक सन्मान मिळाले आहेत. ‘भूमी’ ला 2007 चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. यात त्यांनी प्रथमच एका तमिळ मुलीचे भावविश्व रेखाटले आहे. ‘दर्पण’ हा त्यांचा गाजलेला कथासंग्रह आहे. या पुस्तकासाठी केशवराव कोठावळे पुरस्कार त्यांना मिळाला.

आशाताईंना संगीताची खूप आवड आहे. संगीतावर त्यांनी अनेकदा लिहिलेही आहे. त्यांच्या लेखनातसुद्धा संगीताचा संदर्भ हमखास येतोच. तसेच एकत्र  कुटुंबांत होणारी स्त्रियांची घुसमट अनेक कथांमधून त्यांनी समर्थपणे मांडली आहे.

SL/KA/SL

28 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *