पाहा … जल स्वावलंबन असणारे दीडशे विहिरींचे गाव
वाशिम, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जल स्वावलंबनासाठी
पाण्याचे शाश्वत नियोजन करणारे वाशिम जिल्ह्यातील केकत उमरा या गावात १५० हून अधिक पुरातन विहरी आहेत. पाण्याच्या पावित्र्याबद्दल संभाषणामध्ये या म्हणीचा वापर आपण सर्रास करतो मात्र दुष्काळ परिस्थितीत याच पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे अनेकांच्या जीवनाचा रंग उडून जातो. दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी वाशिम जिल्हयातील केकत उमरा या गावात शेकडो वर्षांपुवी तब्बल १५० हून अधिक विहरी बांधल्या आहेत.
आजही या पुरातन विहीरींना पाणी असून गावकरी या पाण्याचा वापर करतात. त्यामुळे जलसंधारण कसे करावे हे केकत उमरा या गावातील पूर्वजांनी बांधलेल्या या विहरीवरून लक्षात येते. जलस्वावलंबनासाठी तत्कालीन परिस्थितीमध्ये गावात विकसित केलेल्या या श्वाश्वत जलस्त्रोतांमुळे विहरींचे गाव म्हणून केकत उमरा या गावाची जिल्हयात ओळख निर्माण झाली आहे.
कुपनलीका अर्थात ‘बोअरवेल’ तंत्रज्ञान विकसीत होण्यापूर्वी नैसर्गिक जलस्त्रोतांवरच गावकरी अवलंबून राहत असत. त्यामुळे पुरेसा जलसाठा राहावा यासाठी येथील पूर्वजांनी या विहरी बांधल्या असे गावकरी सांगतात. केकत उमरा या गावाच्या पूर्वेला असणारा एकबुर्जी धरण प्रकल्प आणि परीसरातून प्रवाहीत झालेली पैनगंगा नदी यामुळे या गावातील बरीचशी शेती सिंचनाखाली आली आहे.
आजही या गावात दिडशेच्या वर पुरातन विहरी पाहायला मिळतात. बऱ्याचशा जुन्या विहरींवर घरे बांधली असून अंगण, वाडा, एवढेच नव्हे तर चक्क स्वंयपाक घरातही विहीर पाहायला मिळते.
ML/KA/PGB 4 Jan 2024