औरंगाबादेतही जामतारा मॉडेल, पोलिसांची मोठी कारवाई …

 औरंगाबादेतही जामतारा मॉडेल, पोलिसांची मोठी कारवाई …

औरंगाबाद, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  ऑनलाइन भारत पे ॲप द्वारे इन्स्टंट लोन दिल्यानंतर कर्जदारास शिवीगाळ करणे, धमक्या देणे, सोशल मीडियावर कर्जदारांची छायाचित्रांचे मॊर्फिंग करून वायरल करण्याच्या प्रकारामुळे झारखंड मधील डेहराडून शहरातील शेकडो नागरिक त्रस्त होते.

ऑनलाइन फसवणुकीसाठी देशभर बदनाम असलेल्या झारखंड राज्यातील “जामतारा येथील मॉडेलनुसार ऑनलाईन भारत पे ॲप द्वारे इन्स्टंट लोन” घेणाऱ्यांकडून पैसे वसूल करण्यासाठी देशभरात फसवणुकीचे जाळे निर्माण केलेले कॉल सेंटर काल औरंगाबादेत उध्वस्त करण्यात आले आहे.

ही कारवाई पैठणगेट परिसरातील यश एंटरप्राईजेस आणि संकल्प क्लासेस असलेल्या इमारतीत करण्यात आली, यावेळी 1 हजार पेक्षा अधिक मोबाईल जप्त केले असून, दोन तलवारी ही सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. या सेंटरमध्ये काम करणारे 200 पेक्षा अधिक तरुण मुले फोनवर शिवीगाळ करताना आढळून आले. तर या कॉल सेंटरमध्ये चक्क तीन शिफ्ट मध्ये चालत फसवणुकीचे काम चालत होते. या ठिकाणी काही तरुणांना प्रशिक्षण सुद्धा दिल्या जात होते ,पोलीसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले आहे.

ML/KA/SL

20 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *