जम्मू काश्मीरमध्ये ‘इंडिया’ला ५२ जागांवर आघाडी, भाजपाला २८, तर पीडीपी ८ जागांवर पुढे

जम्मू-काश्मिरमधील आठ मतदारसंघातील विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. नॅशनल कॉन्फरन्सने गुरेज, हजरतबल आणि झाडीबलमध्ये विजय मिळवला आहे. तर भाजपाने चेनानी, उधमपूर पूर्व, बिल्लावर, बासोहली, जम्मू पश्चिम या पाच मतदारसंघात विजय मिळवला आहे. बसोल्ही मतदारसंघातून भाजपचे दर्शन कुमार विजयी झाले आहेत. ते यंदाच्या निवडणुकीत विजय मिळवणारे भाजपचे पहिले आमदार ठरले आहेत.