नियमबाह्य जमीन परवाने देणारा अधिकारी निलंबित, उर्वरित आठ जणांची चौकशी

मुंबई दि ४– नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात तुकडेबंदी कायद्याची पायमल्ली करून सरकारी रक्कम जमा न करता जमिनींच्या परवानग्या दिल्याप्रकरणी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्याला निलंबित करण्याची आणि आठ नोंदणी अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात केली.
याबाबतचा मूळ प्रश्न गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला होता. दोन सलग जमिनींची अदलाबदल करण्याचे अधिकार असताना दोन स्वतंत्र गावातील जमिनी अदलाबदल करण्यात आल्या, त्यांचे तुकडे करून , नजराणा न भरता परस्पर परवानगी देण्यात आली आणि नोंदणी करण्यात आल्या अशा गोष्टी लक्षात आल्या आहेत, या बाबी २०१३ ते १९ या काळात झाल्या अशी माहिती बावनकुळे यांनी यावेळी दिली. उपविभागीय अधिकारी यांना तातडीने निलंबित करून, अधिवेशन संपण्यापूर्वी आठ नोंदणी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल तसेच सर्व संबंधित लोकांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल असं मंत्री म्हणाले. ML/ML/MS