पाण्यासाठी शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

 पाण्यासाठी शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

यवतमाळ, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील अरुणावती प्रकल्प होऊन 30 वर्षाचा कालावधी झाला आहे. मागणी करून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या आर्णी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले.

एका मागून एक शेतकऱ्यांनी प्रकल्पात उड्या घेतल्या. या आंदोलनामुळे प्रशासनाची दाणादाण उडाली.
अरुणावती प्रकल्पाच्या कालव्यावर 30 किलोमीटर पलीकडे सिंचनाचे पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी जलसमाधी आंदोलन केले.

घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला होता. धरण झाल्यापासून आजपर्यंत कुर्‍हाड, अंतरगाव, केळझर या भागात सिंचनासाठी पाणी मिळालेले नाही. अधीक्षक अभियंता न आल्याने शेतकऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त केला.Jalsamadhi movement of farmers for water

ML/KA/PGB
14 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *