जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुहूर्त ठरला…

जालना, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जालना- मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाडीचा मुहूर्त ठरला असून 30 डिसेंबर रोजी रेल्वे ला हिरवा झेंडा दाखवून रेल्वेला सुरुवात केली जाणार आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ही माहिती दिली आहे.
जालना- मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाडी सकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी धावणार असून 30 डिसेंबर रोजी 11 वाजता जालना रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवून विशेष रेल्वे ला सुरुवात केली जाणार आहे. आज माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त जालन्यातील भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास जलदगतीने होण्यास मदत होणार असून व्यापारासाठी तसेच मंत्रालय वगैरे अशा कामांसाठी जाणाऱ्यांना फायदेशीर असणार आहे.
ML/KA/SL
25 Dec. 2023