जालना आंदोलन , दोन वरिष्ठ अधिकारी निलंबित

 जालना आंदोलन , दोन वरिष्ठ अधिकारी निलंबित

जालना, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  अंतरवाली सराटी लाठीचार्ज प्रकरणातील दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी अखेर निलंबित झाले आहेत त्यानुसार गृह विभागाने आदेश जारी केले आहेत.Jalna movement, two senior officials suspended

काल या झालेल्या बैठकीत नंतर शासनाने तडक पावले उचलत राहूल खाडे, अप्पर पोलिस अधीक्षक, जालना आणि मुकुंद आघाव उपविभागीय पोलिस अधिकारी, अंबड यांना शासन आदेशाच्या दिनांकापासून म्हणजे आजपासून शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे असे आदेश महाराष्ट्र शासनाचे उपसचिव चेतन निकम यांनी जारी केले आहेत. तसेच जोपर्यंत निलंबनाचे आदेश अस्तित्वात असतील तोपर्यंत यांचे मुख्यालय जिल्हा पोलीस अधीक्षक, जालना यांचे कार्यालय हे राहील. त्यांना पोलीस अधीक्षक, जालना यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.

पोलीस अधीक्षक, जालना यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांनी मुख्यालय सोडल्यास ती त्यांची गैरवर्तणूक ठरेल आणि त्या कारणासाठी वेगळ्या शिस्तभंगाच्या कारवाईस ते पात्र ठरतील असा आदेश जारी करण्यात आला आहे. आज मनोज जरांगे यांनी समाज बांधवांची, ग्रामस्थांची बैठक घेत सरकारने १ महिन्याची वेळ मागितली यावर मत जाणून घेत, सरकार पुढे ५ अटी ठेवत, १ महिन्याचा अवधी दिला असून त्यांचे आंदोलन मात्र सुरूच राहील असे त्यांनी जाहीर केले आहे.

ML/KA/PGB
12 Sep 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *