मुसळधार पावसामुळे जालन्याच्या केळी बागेचे मोठे नुकसान….

जालना दि २९: जालन्याच्या कोरेगाव येथे मुसळधार पावसामुळे केळी बागेचे मोठे नुकसान झाले आहे. परतूर तालुक्यासह जालना जिल्ह्यात मागील 10 ते 12 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकं आणि फळबागांवर मोठं संकट ओढवलंय. परतूर तालुक्यातील शेतकरी बाजीराव खरात यांनी सुमारे आठ हजार केळीची लागवड केली होती. मात्र, सततच्या पावसामुळे त्यांच्या बागेतील केळी झाडावरच सडत असून प्रचंड नुकसान झालंय. या लागवडीसाठी शेतकरी खरात यांनी जवळपास पाच लाख रुपयांचा खर्च केला होता. पण पावसामुळे आता काहीही उत्पन्न होण्याची शक्यता नसल्याने ते चिंतेत आहेत. दरम्यान, शासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी खरात यांनी केली आहे.ML/ML/MS