जालन्यात आंब्याच्या झाडांना फुटला मोहर, चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा…
 
					
    जालना, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जालन्यात आंब्याच्या झाडांना मोहर फुटलाय. त्यामळे आंबा उत्पादक शेतकरी आनंदित झाले असून त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आंब्याला मुबलक पाणी आणि फळ धरणेसाठी पोषक परिस्थिती असल्याने यंदा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा लागून राहिली आहे. आंब्याच्या झाडांना यंदा मोठ्या प्रमाणात मोहर फुटला असून आंब्यांच्या उत्पन्नात यंदा वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, हवामानाने साथ दिल्यास लवकरच आंब्याची गोड चव सर्वांना चाखायला मिळणार आहे.
ML/ML/PGB 18 Feb 2025
 
                             
                                     
                                    