तमिळनाडूमध्ये जल्लीकट्टूल सुरुवात, जाणून घ्या या थरारक खेळाबद्दल
मदुराई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तामिळनाडूमध्ये मदुराईच्या तीन गावांमध्ये आज मट्टू पोंगलच्या दिवशी जल्लीकट्टूला सुरुवात झाली. यासोबतच जल्लीकट्टूदरम्यान 19 जण जखमी झाले आहेत. अकरा जणांना मदुराई येथील शासकीय राजाजी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. जल्लीकट्टू हा एक असा खेळ आहे ज्यात बैलाला गर्दीत सोडले जाते. या खेळात सहभागी होणाऱ्या लोकांना बैलाला धरून नियंत्रित करावे लागते. जो खेळाडू सर्वाधिक बैल नियंत्रित करतो त्याला विजेता म्हणून घोषीत केले जाते. या खेळामध्ये अनेक बैलांना खुल्या मैदानात सोडले जाते, त्यानंतर खेळाडू त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. यावेळी संतप्त बैल खेळाडूंनाही जखमी करतात.
गेल्या 400 वर्षांपासून हा खेळ खेळला जात आहे. जल्लीकट्टूला एरु थझुवुथल आणि मनकुविरट्टू असेही म्हणतात. हा खेळ पोंगल सणाचा एक भाग आहे. मदुराईतील अवनियापुरम येथे आज (दि.15) जल्लीकट्टूचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी पलामेडूमध्ये आणि मंगळवारी अलंगनलूरमध्ये हा खेळ खेळाला जाईल.
जल्लीकट्टू स्पर्धेत फक्त 300 खेळाडू आणि 150 प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. सुमारे 10,000 बैल आणि 5,400 बैल मालकांनी नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज दिले होते. त्यापैकी केवळ 800 बैलांना सहभागी होण्यासाठी परवानगी देण्यात आली. एक बैल तीनपैकी फक्त एका इव्हेंटमध्ये सहभागी होऊ शकतो.
जल्लीकट्टू हा तमिळनाडूच्या ग्रामीण भागातील एक पारंपारिक खेळ आहे. जो पोंगल सणाच्या वेळी आयोजित केला जातो, जिथे बैलांची माणसांशी लढाई केली जाते. मात्र, हा खेळ अनेकदा जीवघेणा ठरला आहे. प्रत्येक वर्षी या खेळाचे आयोजन केले आहे. यामध्ये अनेकजण जखमी होतात, तर काही जणांना स्वत: चा जीव देखील गमवावा लागतो.
SL/KA/SL
15 Jan. 2023