शिवचरित्राचे अभ्यासक डॉ जयसिंगराव पवार यांचे निधन
कोल्हापूर दि २६ : महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांचे कोल्हापुरात निधन झाले. यानिमित्ताने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर अंत्यदर्शनासाठी कोल्हापुरात येत आहेत.
महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन
क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे आज पहाटे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार
सुरू होते. मात्र, आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
डॉ. जयसिंग पवार यांच्या निधनाने मराठा साम्राज्याच्या इतिहासाचं एक विद्यापीठ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्राचे ते प्रमुख होते या केंद्राच्या माध्यमातून त्यांनी राजर्षी शाहू महाराज यांचं चरित्रात्मक वाङ्मय भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये प्रकाशित करण्यात सिंहाचा वाटा उचलला. मराठेशाहीचा खरा इतिहास आधुनिक काळात लोकांसमोर आणण्यात प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे योगदान महाराष्ट्र विसरणार नाही.ML/ML/MS