जायकवाडी धरणातीन विसर्ग वाढविण्यात आला …

छ.संभाजी नगर दि २९–
जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरणाचा विसर्ग वाढवला आहे. नाथसागरातून 75 हजार 456 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणाचे 18 दरवाजे 4 फूट उचलून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे अशी माहिती सहायक अभियंता मंगेश शेलार यांनी दिली. गोदाकाठच्या गावांनी सतर्क रहाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सध्या नाथसागर धरणाची पाणी पातळी ही 99.28 टक्यावर गेली असून धरणात 57 हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे.ML/ML/MS