दिव्यांगावर मात करीत जयसिंगने मिळवायला राष्ट्रीय पुरस्कार …
नागपूर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जीवनात उंच भरारी घेण्याचे स्वप्न मनात बाळल्यास आणि त्यासाठी जिद्दीने, प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळते हे नागपुरातील एका तब्बल 70% दिव्यांग असणाऱ्या जयसिंग चव्हाण यांनी आपल्या कार्य कर्तृत्वाने दाखवून दिले आहे. Jai Singh overcomes disability to win National Award…
नागपूरात राहणाऱ्या जयसिंग चव्हाण यांना बालपणात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या एका चुकीमुळे नशिबी अपंगत्व आले मात्र,आपल्या अपंगत्वावर मात करून जीवनात यशस्वी उद्योजक होण्याचे त्यांनी स्वप्न रंगविले होते . वयाचा 20 व्या वर्षी त्यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात घरोघरी जाऊन साबण विकण्याचे काम सुरू केले. इथून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज 250 कोटीची उलाढाल असलेला उद्योग म्हणून नावारूपाला आला आहे.
आज त्यांची गणना नागपुरातील यशस्वी उद्योजक म्हणून केली जाते. आपल्या शारीरिक व्याधीतही यशाची पायरी चढत जयसिंग चव्हाण यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे. कधीकाळी पोट भरण्यासाठी मिळेल ते काम स्वीकारण्याची त्यांनी तयारी असायची. मात्र शरीराने दिव्यांग असल्यामुळे त्यांना काम मिळणे देखील कठीण झाले होते.
या व्याधीला आपल्या जीवनाची दुर्बलता न बनू देता शस्त्र मानून जयसिंग चव्हाण यांनी कोट्यधीश होण्यापर्यंतचा प्रवास केला आहे.त्यांना आत्तापर्यंत तब्बल 400 विविध पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे . तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा हस्ते ही जयसिंग चव्हाण यांना उत्कृष्ठ उद्योजक म्हणून सन्मानित करण्यात आले होते .
यशस्वी उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिव्यांग जयसिंग चव्हाण यांना आज साजरा होत असलेल्या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त केंद्र सरकारचा सामाजिक न्याय विभागातील सर्वश्रेष्ठ दिव्यांग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांचा हस्ते दिल्ली येथे विज्ञान भवनात प्रदान करण्यात आला आहे. त्यांचा हा यशस्वी प्रवास देशातील लाखो दिव्यांग बांधवांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
ML/KA/PGB
3 Dec .2022