जग्वार कंपनीने १०२ वर्षांनंतर लाँच केला नवीन लोगो

 जग्वार कंपनीने १०२ वर्षांनंतर लाँच केला नवीन लोगो

लक्झरी कारसाठी ओळखल्या जाणाऱ्या जॅग्वार कंपनीने त्यांचा लोगो बदलला आहे. जग्वारने आपल्या कंपनीचा आयकॉनिक लोगो तब्बल १०२ वर्षांनी चेंज केला आहे. कंपनीने मंगळवारी ही घोषणा केली आहे. जॅग्वार कंपनी त्यांच्या सीडान आणि महागड्या कारसाठी खूप प्रसिद्ध आहे. जगभरात जॅग्वार कारचे चाहते आहेत. आत्तापर्यंत कंपनीने जगभरात विविध प्रकारचे मॉडल जारी केले आहेत. आता कंपनी २०२६ साली संपूर्णपणे इलेक्ट्रिक कार निर्माता म्हणून बाजारात उतरण्याची तयारी करत आहेत. त्यामुळंच कंपनीने त्यांचा आयकॉनिक लोगो बदलला आहे. . मात्र, कंपनीचा नवीन लोगो नेटकऱ्यांना आवडला नाहीये. त्यामुळे ते कंपनीला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करत आहेत.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *