जागतिक कारविरहीत दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी काढली सायकल रॅली.
वाशिम, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशिम येथील एस एम सी ईंग्रजी शाळेच्या राष्ट्रीय हरीत सेनेच्या विद्यार्थ्यांनी २२ सप्टेंबर हा दिवस जागतिक कारविरहित म्हणून पाळण्यात यावा असे आवाहन करण्यात आले. या निमीत्त शहरातून सायकल रॅली काढून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.
सध्या जागतिक तापमानात वाढ ,इंधनाचा तुटवडा तसेच प्रदूषण नियंत्रण ह्या समस्या जगातील सर्वच शास्त्रज्ञांपुढील प्रमुख आव्हाने ठरली आहेत. त्यांचे निराकरण करण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न करण्यात येत आहेत. गेल्या काही दशकांत वाढलेल्या प्रदूषणामुळे पृथ्वी भोवतालाचा ओझोनच्या वायूचा थर विरळ होत चाललेला आहे. जागतिक प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वांनी हातभार लावणे आवश्यक आहे म्हणून हा संदेश सर्वत्र जावा आणि जनजागृती व्हावी यासाठी यासाठी राष्ट्रीय हरित सेनेच्या चिमुकल्यांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.
यानिमित्त सायकल रॅली द्वारे तसेच प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली. सदर उपक्रम प्राचार्य मीना उबगडे तसेच राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक अभिजीत मुकुंदराव जोशी, शिक्षक महेश देशमुख यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला.
ML/KA/PGB 22 Sep 2023