बाजार समिती बाहेर गुळाचा व्यापार, त्यामुळे सौदे पडले बंद….
सांगली, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :व्यापाऱ्यांनी गुळाचा व्यापार बाहेर परस्पर सुरू केल्यामुळे बाजार समितीत गुळाचे सोदे बंद पडले आहेत. त्यामुळे हमाल तोलाईदार तसेच व्यापारी यांचे नुकसान होत आहे. तसेच मार्केट कमिटीच्या उत्पन्नावर मर्यादा आल्या आहेत. म्हणून या प्रश्नाचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीने एक समिती नियुक्त केली आहे.
ही समिती आठ दिवसात आपला अहवाल देणार आहे अशी माहिती समितीचे अध्यक्ष सुजय नाना शिंदे यांनी दिली.
कर्नाटक सीमाभाग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील गुळ विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर येतो. कोल्हापूरच्या बरोबरीने सांगलीत गुळाची आवक होत आहे. या गुळाची विक्री सौदे पद्धतीन केली जाते पण काही व्यापाऱ्यांनी गुळाचा सौदा हा बाजारसमिती आवाराबाहेर परस्पर सुरू केला. त्यामुळे गुळाचे दैनंदिन सौदे काही दिवसापासून बंद पडले आहेत त्यामुळे हमाल तसेच तोलाईदार यांना मिळणारे काम थांबले आहे शिवाय गुळ विक्रीपासून येणारे उत्पन्न थांबले आहे. व्यापारी वर्गाच ही त्यामुळे नुकसान होत आहे. म्हणून अभ्यास समिती नेमून अहवाल मागवण्यात आला आहे. गुळाचे सौदे पूर्ववत सुरू करावेत अन्यथा या प्रश्नावर आंदोलन करावे लागेल असा इशारा हमाल पंचायतीने दिला आहे.
SW/ML/PGB
21 Sep 2024