जगबुडी नदीने गाठली धोक्याची पातळी…

रत्नागिरी दि १८:– खेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे पुरस्थिती गंभीर होत चालली आहे. आज सकाळी ९.३० वाजेपर्यंत जगबुडी नदीवरील भरणे नाका पुलाजवळ पाणीपातळी ७.४० मीटर इतकी नोंदवली गेली असून, ही पातळी धोक्याच्या ७ मीटर रेषेपेक्षा वर गेली आहे. पाण्याची वाढ अजूनही सुरूच आहे.खेड नगरपरिषदेने नागरिक आणि व्यापारी बांधवांना तातडीचा इशारा दिला आहे. सर्वांनी आपल्या कुटुंबियांसह सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
खेड-दापोली मार्गावर नारगोली येथे झाड कोसळल्यामुळे काही वेळ रस्ता बंद होता. सध्या एकाच लेनवर वाहतूक सुरू आहे आणि झाड हटवण्याचे काम सुरू आहे.खेडमध्ये जोरदार पावसामुळे काही शाळांनी विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात १७० मिलिमीटर नोंदवला गेला आहे. गेल्या ४८ तासांत खेडमध्ये तब्बल ३४० मिलिमीटर पाऊस पडला आहे.
खेड दापोली मार्गावर सुर्वे इंजिनिअरिंग भागात रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याला वेग असल्याने रस्ता बंद करण्यात आलेला आहे रस्त्यावर पाणी आलं आहे एकूणच, सलग दुसऱ्या दिवशी खेड तालुका कोकणात सर्वाधिक पावसाची नोंद करत असून, नदी-नाल्यांना पूर आला आहे. प्रशासनाने सतर्क राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. ML/ML/MS