जगतगुरु आणि माऊलींची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ
पुणे, दि. १४(एमएमसी न्यूज नेटवर्क): हातात टाळ घेऊन हरिनामाच्या जल्लोषात मग्न झालेले वारकरी दोन दिवस पुण्यनगरीत मुक्कामी होते .संत ज्ञानेश्वर महाराजांचे पालखीने पुण्यनगरीतील भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात दोन दिवस मुक्काम केला . जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पुण्यातील दोन दिवसांच्या नाना पेठेतील निवडुंग विठ्ठल मंदिरातील मुक्कामनानंतर आज पहाटे या दोन्ही ही पालख्या पंढरपूरचे दिशेने पस्थान झाले…
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी लोणी काळभोर तेथे मुक्काम करेल तर संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी हे दिवेघाट मार्गे सासवड येथे मुक्कामी असणार आहे.. पुण्यातून निघणाऱ्या दोन्ही पालख्या हडपसर पर्यंत एकत्र जातात. हडपसर येथील गाडीतळ भागात या दोन्ही पालख्यांची मार्ग वेगळे होतात… ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवे घाटातून पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलाच्या भेटीसाठी निघते. तेव्हा दिवे घाटात ”माऊली माऊली”, ”ज्ञानोबा माऊली तुकाराम”, ”विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल’ असा हरिनामाचा गजर करीत लाखो वारकरी आणि पालखीचे दृश्य मोहून टाकतात.. या वेळी सर्वत्र उत्साह आणि चैतन्याचे वातावरण असते.
ML/KA/SL
14 June 2023