जाधव कुटुंबीय नेहमीच काम करत असते शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे

मुंबई, दि २५
शिवसेना ही नेहमीच जनसामान्यांसाठी काम करत असते आणि राहणारच. माजी आमदार यामिनी जाधव या लोकसभेला आणि विधानसभेला पराजित होऊन देखील आज लोकांसाठी काम करत आहेत असे जाहीर उद्गार शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी माझगाव येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुणगौरव समारंभात केले. ते पुढे म्हणाले जे खोटा बोलून संविधान खतरे मे हे असं बोलून निवडून आले. ते आता कुठे गेले. त्यांनी आता एक तरी कार्यक्रम घेतला का. लोकांनी कुठे तरी या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत महापालिकेवर शिवसेनेचा भगवाच फडकणार असे देखीलं आश्वासन देखील शिंदे यांनी दिले.
आम्ही लोकांसाठी काम करत असून आम्ही दिव्यांगाना झेरॉक्स मशीन दिल्या. तर महिला बचत गटातील महिलाना फूड ट्रॅकचे वाटप केले. यावेळी आम्ही सहा फूड ट्रॅकचे वाटप केले असून पुढच्या वर्षी साठ फूड ट्रॅक देणार असल्याची माहिती शिवसेना नेते, माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आपल्या भाषणातून दिली. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांना बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे भायखळा विधानसभा संघटक विजय लीपारे, दत्ता जाधव, शाखाप्रमुख राकेश खानविलकर, स्मिता साळवी, जगदीश नलावडे आणि इतर शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.KK/ML/MS