जे जे परिसरात बॉम्बस्फोटाची धमकी

मुंबई, दि.25( एमएमसी न्यूज नेटवर्क):मुंबईच्या जे.जे. रुग्णालय परिसरात बॉम्बस्फोट घडविण्यात येणार असल्याची मुंबई पोलिसांच्या दक्षिण नियंत्रण कक्षाला दूरध्वनीवरून धमकी देणाऱ्या तरूणाला सर जे जे मार्ग पोलिसांनी अटक केली आहे.अश्विन भारत महिसकर असे या तरुणाचे नाव असून तो नागपूरचा रहिवाशी असल्याचे तपासत पुढे आले आहे.

या भागात बॉंबस्फोट घडवणार !

शुक्रवारी दक्षिण नियंत्रण कक्षात पोलीस उप निरीक्षक रुपाली कदम या कार्यरत असताना दुपारी दीडच्या सुमारास एक दूरध्वनी आला होता. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने बंदरगाह परिसर, मुंबई या ठिकाणी २३ फेब्रुवारीला ९० किलो एम डी व स्फोटके उतरविण्यात आले असून जे. जे. हॉस्पिटल, भेंडीबाजार, नळबाजार परिसरात स्फोटकांच्या साह्याने बॉम्बस्फोट घडवण्यात येणार असल्याचे सांगून फोन कट केला.याबाबतची माहिती कदम यांनी दक्षिण नियंत्रण कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अनुप डांगे व अपर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांना दिली . मुंबई शहर हे दहशतवादी हल्ल्याचे दृष्टीकोनातून अतिरेकी संघटनांच्या केंद्रस्थानी असल्याने या प्रकरणाची अपर पोलीस आयुक्त सावंत यांनी गांभीर्य दखल घेवून दक्षिण प्रादेशिक विभागांतर्गत सर्व बंदर परिसर, लॅन्डींग पॉईटस, मर्मस्थळे, संवेदनशिल व गर्दीची ठिकाणे असलेल्या परिसरात सुरक्षा व सतर्कता पाळण्याचे आदेश दिले.

गुप्त पद्धतीने शहानिशा

ही खळबळजनक माहिती सामन्य जनतेत पोहचल्यास अफवा पसरून सर्वसामान्या मध्ये घबराहट निर्माण होऊ शकते .यातून एखादा अनुचित प्रकार घडण्याची शक्याता असल्यामुळे या माहितीची अत्यंत गुप्त पद्धतीने शहानिशा करून पुढील योग्य ती कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर जे.जे मार्ग पोलीस तसेच सागरी किनाऱ्याची हद्द असलेल्या येलोगेट, कुलाबा, मरिन ड्राईव्ह, डी. बी. मार्ग या पोलीस ठाण्यांना माहिती देण्यात आली. याप्रकरणी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास करण्यात आला.तपास पथकाने जे .जे. रुग्णालय, भेंडीबाजार व नळ बाजार परिसरात शोध घेतला .परंतु काहीही आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या नाहीत. तसेच कॉलरने खोटी माहिती दिली असल्याचे निष्पन्न झाले. डहाणू मधून तरुणाला अटक पोलिसांची शोधमोहीम सुरू असताना नागपूर येथील रहिवासी असलेल्या अश्विन महिसकर याने हा दूरध्वनी पालघर येथील डहाणू रेल्वे स्थानकावरून केल्याचे तपासत निष्पन्न झाले आहे .पोलिसांनी त्यास 9 तासात अटक करून त्याच्या विरुद्ध सर जे. जे. मार्ग पो. ठाणे कलम ५०६ (२), ५०५ (१), १८२, १७९ भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. चौकशीत त्याने खोटी माहिती दिल्याची कबुली दिली आहे.

ML/KA/PGB

25 feb. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *