ऐकावं ते नवलचं! चंद्रावर सापडली गुहा, भविष्यात होणार अनेक फायदे

 ऐकावं ते नवलचं! चंद्रावर सापडली गुहा, भविष्यात होणार अनेक फायदे

नील आर्मस्ट्राँग आणि बझ अल्ड्रिन यांनी 55 वर्षांपूर्वी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते, त्याच्या जवळच चंद्रावर मोठी गुहा असल्याचे पुरावे शास्त्रज्ञांना मिळाले आहेत. या गुहा भविष्यातील अंतराळवीरांसाठी आश्रयस्थान म्हणून उपयुक्त ठरू शकतात, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. NASA च्या ‘लूनर रिकॉनिसेंस ऑर्बिटर’च्या माध्यमातून करण्यात आलेल्या विश्लेषणातून या गुहेचं संशोधन जगासमोर येण्यास मदत झाली आहे. साधारण 100 मीटर इतकी खोली असणाऱ्या या गुहेमध्ये मनुष्याला तळ ठोकता येऊ शकतो असं म्हणत अशा शेकडो गुहा चंद्रावर असण्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

चंद्रावरील जीवसृष्टीसंदर्भातील निरीक्षणं सुरु असतानाच समोर आलेली ही गुहा ही अत्यंत महत्वाचं संशोधन असून संकटाच्या प्रसंगी अंतराळवीरांना ती आसरा देण्याचं काम करु शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. या गुहेसंदर्भातील पुढील संशोधन सुरू असून, येत्या काळात (NASA) नासाकडून चंद्रावर सेमी-परमनेंट (अर्ध-स्थायी) क्रू बेस बनवण्याच्या दिनेशंही पावलं उचलली जात आहेत. दरम्यान, संशोधक आणि अभ्यासकर्त्यांनी या गुहेची तुलना पृथ्वीवर ज्वालामुखीच्या उद्रेकातून नैसर्गिकरित्या तयार झालेल्या भुयारांशी केली आहे. चंद्रावर आढळलेल्या या गुहेमध्ये येत्या काही वर्षांमध्ये किंवा भविष्यात मानवी वावर सहज शक्य आहे अशी आशा सध्या व्यक्त केली जात आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *