प्रथा, परंपरा यांच्या नावाखाली धुडगूस चालणार नाही

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धर्माधर्मांमध्ये सौहार्द वाढवणाऱ्या कोणत्याही श्रद्धा आणि परंपरा पाळण्यासाठी सरकारची मनाई नाही मात्र या प्रथा परंपरांच्या नावाखाली धुडगूस घालता येणार नाही असा इशारा आज उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिला.
प्रथा परंपरांच्या नावावर खोडसाळपणा होत असेल आणि विनाकारण धार्मिक तेढ निर्माण होत असेल तर दोन्ही बाजू ऐकून घेणं सरकारचं काम आहे असं ते म्हणाले. संदल मिरवणुकीच्या वेळी काही युवकांनी नाशिक जिल्ह्यात त्रंबकेश्वर इथल्या शिवमंदिरात प्रवेश करण्यावरून धार्मिक तेढ निर्माण झाल्याप्रकरणी तारांकित प्रश्न राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला होता याला फडणवीस यांनी उत्तर दिलं.
त्र्यंबकेश्वरला ही परंपरा होती की नाही याबाबाबत मतमतांतरे आहेत , मंदिराच्या विश्वस्तांनी तक्रार केल्याची दखल सरकारने घेतली असून यासाठी नेमण्यात आलेल्या एसआयटीचा तपास एका महिन्यात पूर्ण केला जाईल असं त्यांनी सांगितलं.
ML/KA/SL
24 July 2023