चिमुरडीचे ‘या’ गाण्यावरचे हावभाव पाहून वाटेल मजा

सोशल मीडियावर सध्या एका चिमुरडीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ही मुलगी ‘इतनी शक्ति हमें देना दाता’ हे गाणं अतिशय भावनिक स्वरात गाताना दिसते आहे. तिचा गोड आवाज आणि निरागस हावभाव पाहून नेटिझन्सना त्यांचे बालपण आठवत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडिओ केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.