हा आहे भारताकडून सर्वाधिक शस्त्रास्त्र आयात करणारा देश

 हा आहे भारताकडून सर्वाधिक शस्त्रास्त्र आयात करणारा देश

छायाचित्र संग्रहित

नवी दिल्ली, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वर्षानुवर्षे अत्याधुनिक शस्तास्त्रांसाठी अमेरिका,रशिया, फ्रान्स, जपान या देशांवर अवलंबुन असणारा भारत आता शस्त्रास्त्र निर्यातदार म्हणून उदयास येत आहे. भारतासाठी हा देश आर्मेनिया आता शस्त्रास्त्र निर्यातीसाठी प्रमुख देश ठरला आहे. दोन्ही देशांमधील संरक्षण संबंधांमध्ये वाढ झाली असून, भारताने संरक्षण निर्यातीत सर्वकालीन उच्चांक नोंदवला आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भारताने आर्मेनियाला २१,०८३ कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्रांची निर्यात केली आहे. युरेशियामधील वाढत्या सुरक्षेच्या चिंतेमुळे आर्मेनियाची भारताबरोबरची भागीदारी अधिक मजबूत झाली आहे. भारताबरोबरचे संबंध मजबूत झाल्याने आर्मेनियाचे रशियन शस्त्रांवरील ऐतिहासिक अवलंबित्व कमी झाले आहे.

भारतीय अर्थ मंत्रालयाच्या अहवालात असे म्हटले आहे की, आर्मेनियाने पिनाका मल्टिपल-लाँच रॉकेट सिस्टीम आणि आकाश अँटी-एअरक्राफ्ट सिस्टीम्सच्या खरेदीबाबतचा करार केल्यानंतर हा देश भारताकडून शस्त्रास्त्रांचा सर्वांत मोठा आयातदार ठरला आहे.” अहवालात पुढे नमूद करण्यात आले आहे, “चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या सुरुवातीपर्यंत भारताकडून आर्मेनियाने केलेल्या शस्त्रास्त्रांच्या खरेदीचे एकूण प्रमाण ६०० दशलक्ष डॉलर्सवर पोहोचले आहे.”

SL/ML/SL

30 Oct. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *