मोदींच्या धोरणांमुळेच भारतावर मंदीचे सावट नाही
औरंगाबाद, दि. 08 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांच्या उपस्थितीत औरंगाबादेतील अॅडवांटेज महाराष्ट्र एक्सपो २०२३ चा समारोप पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अॅडवांटेज महाराष्ट्र एक्सपोच्या आयोजनाबाबत उद्योजकांचे कौतुक केले.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे प्रदर्शन झाल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगत मसिआ या मराठवाड्यातील उद्योजक संघटनेचे कौतुक केले. मराठवाडा आणि विदर्भातील उद्योजकांना देण्यात येणाऱ्या वीज सबसिडीची पुनर्रचना करणार आहे असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजकांना याप्रसंगी दिले.
आगामी दोन वर्षात शेतकऱ्यांना सौर उर्जेवर स्वयंपूर्ण करणार असल्याचे सांगितले यामुळे मराठवाडा, विदर्भातील उद्योगांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, सध्याचा काळ हा भारतातील उद्योजकांना गुंतवणुकीसाठी सर्वात चांगला काळ आहे. मंदीच्या काळात आपली वाढ होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राबवलेल्या योजनांमुळे आम्ही आठ टक्क्यांनी वाढत आहे. जगाचा चीन वरचा विश्वास उडत असून एके काळी जगातील चाळीस टक्के उत्पादन करणारा चीन आज मात्र त्यांच्या नियमांमुळे आणि असुरक्षितता त्यामुळे जगातील गुंतवणूकदार चीन मधून बाहेर पडत आहेत.
चीनमधून मोठ्या प्रमाणात उद्योग बाहेर जात असून केवळ भारतच या उद्योजकांना समाविष्ट करू शकेल अशी स्थिती सध्या आहे. त्यांना एकच देश क्षमतेचा वाटतो तो फक्त भारत आहे. त्यामुळे उद्योजकांसाठी चांगले दिवस आहे. कोविड काळात पंतप्रधान मोदींनी भारतातील सर्व नागरिकांना २० लाख कोटींचे आत्मनिर्भर पॅकेज दिले होते, त्या अंतर्गत लघू उद्योजकांसाठी विशेष पॅकेज होते आज त्याचे परिणाम दिसून येत आहेत.
आज आपण जगातील पाचवी अर्थव्यवस्था असून आपली वाटचाल जगातील तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे होत आहे. समृद्धी महामार्ग हा मराठवाड्यासाठी महत्त्वाचा आहे. येणाऱ्या सहा महिन्यात हा मार्ग मुंबईला जोडला जाईल. मात्र, त्याचवेळी नागपूर-गोवा महामार्ग हा देखील मराठवाड्यासाठी समृद्धी आणणार आहे.
याचे नाव नागपूर-गोवा महामार्ग असले तरी मराठवाड्यातील चार ते पाच जिल्ह्यांतून हा महामार्ग जाणार आहे.
हा केवळ महामार्ग नसून इकॉनॉमिक कॉरिडोर असणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना विदेशात ज्यावेळी दौरा असायचा त्यामध्ये औरंगाबादमधील उद्योजकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असायचा. त्यावेळी औरंगाबादचे उद्योजक मराठवाड्यात उद्योग कसे येतील, यासाठी चर्चा देखील करायचे. इथल्या पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी यामुळे भविष्यात अधिक प्रगतीच्या केंद्रस्थानी औरंगाबाद शहर राहणार आहे.
शरद पवारांच्या टिकेला उत्तर
सत्ता हातात आल्यानंतर जमिनीवर पाय ठेवून काम करायचं असतं, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टिका केली होती त्याला आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचे नाव न घेता प्रत्युत्तर दिले.
औरंगाबादेतील अॅडवांटेज महाराष्ट्र एक्सपो २०२३ चा समारोप आज उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी भाषणादरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले, एक्सपोच्या उद्घाटनाच्या वेळी आमच्या विमानात बिघाड झाला होता. त्यामुळे उद्घाटनाला येता आले नाही. मात्र आम्ही केवळ सोय म्हणून विमान वापरतो. आम्ही जमिनीवरच आहोत आणि जमिनीवर राहणार असल्याचे सांगत फडणवीसांनी शरद पवारांच्या टीकेला अप्रत्यक्षपणे उत्तर दिले.It is only because of Modi’s policies that there is no recession in India
ML/KA/PGB
8 Jan. 2023