संभाजीराजे यांना धर्मवीर संबोधणे गैर नाही
पुणे, दि. 03 (एमएमसी न्यूज नेटवर्क): छत्रपती संभाजीराजे यांना धर्मवीर आणि स्वराज्य रक्षक असे दोन्ही संबोधणे गैर नाही असे सांगत खा शरद पवार यांनी राज्यात या विषयावर उठलेला गदारोळ शांत होण्यासाठी एक पाऊल मागे घेतल्याचे आज दिसून आले, ते बारामती येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.It is not wrong to call Sambhaji Raje Dharmaveer
हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत अजित पवार यांनी संभाजी राजे यांना केवळ स्वराज्य रक्षक असेच संबोधले पाहिजे , ते धर्मवीर नव्हतेच असे म्हटले होते. या वर अजित पवारांना लक्ष करीत गेले काही दिवस भाजपा राज्यभर जोरदार आंदोलन करीत आहे, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हिंदुत्वविरोधी असल्याचे चित्र निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
त्यातच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाला हिंदू विरोधी नसल्याचे प्रमाणपत्र देऊन टाकल्याने राष्ट्रवादीच्या राजकीय नुकसानीत मोठी भर पडली आहे. शरद पवार यांनी मात्र आव्हाडांच्या या वक्तव्यावर बोलणे टाळले.
पवारांनी आज संभाजीराजे यांची दोन्ही संबोधने गैर नाहीत , अजित पवार याबाबत माध्यमांशी लवकरच बोलतील असे सांगितले , या वादात माजी खासदार छ्त्रपती संभाजीराजे यांनी अजित पवार यांना कानपिचक्या देत अभ्यास करून बोलण्याचा सल्ला दिला होता , यामुळेच पवारांनी पुढाकार घेत हा विषय हाताबाहेर जाऊ नये अशी काळजी घेण्याचा प्रयत्न आज केला.
ML/KA/PGB
03 Jan. 2023