IT इंजिनिअर 30 तास डिजिटल अटकेत

 IT इंजिनिअर 30 तास डिजिटल अटकेत

मुंबई, दि.28. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नुकत्याच झालेल्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल अरेस्ट पासून सावध राहण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर या विषयावर लोकांमध्ये जागृती निर्माण होत असताच एका हैदराबादमध्ये (Hyderabad) 44 वर्षीय इंजिनिअरला (Engineer) 30 तासांची डिजिटल अटक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 30 तास जाळ्यात अडकल्यानंतर अखेर त्याची सुटका झाली. स्कॅमर्सनी आपण FedEx कुरिअर एजंट आणि मुंबई पोलीस असल्याचा बनाव करत त्याला निर्जनस्थळी नेलं होतं. 30 तास डि़जिटल अटकेच्या जाळ्यात अडकल्यानंतर अखेर थोडक्यात त्याची सायबर गुन्हेगारांच्या तावडीतून सुटका झाली.

सायबर आरोपींनी त्याला आपल्यासह व्हिडीओ कॉलवर ठेवलं होतं. शुक्रवारी रात्री हा सगळा प्रकार सुरु झाला. यादरम्यान पीडित इंजिनिअरने मियापूर ते अमीरपेठपर्यंत 15 किमी प्रवास केला. यावेळी त्याने एका लॉजमध्ये रुम बूक केली. रविवारी सकाळी जेव्हा इंजिनिअरचा कॉल अचानक बंद झाला तेव्हा त्याला संधी मिळाली आणि त्याने सायबर पोलिसांशी मदतीसाठी संपर्क साधला.आयटी इंजिनिअरला मोबाईलवर संशयित मेसेज आले होते. ते स्पॅम असल्याचं लक्षात आल्याने त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. शनिवारी रात्री 3 वाजता हा सगळा प्रकार सुरु झाला जेव्हा आरोपींनी त्याला फोन केला. सुरुवातीला त्यांनी आपण FedEx कुरिअर एजंट असल्याचा आणि नंतर मुंबई पोलीस अधिकारी असल्याचा बनाव केला. यादरम्यान त्याला तुझा आधार कार्ड क्रमांक मनी लाँड्रिंगशी संबंधित एका प्रकरणाशी जोडला असल्याची खोटी बतावणी करण्यात आली.

SL/ ML/ SL

28 October 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *