TDS रिटर्न्स भरणाऱ्यांसाठी IT विभागाचा नवीन नियम

 TDS रिटर्न्स भरणाऱ्यांसाठी IT विभागाचा नवीन नियम

नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आयकर विभागाने टीडीएस रिटर्नबाबत एक नवीन नियम लागू केला आहे. CBDT (सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस) ने 1 ऑक्टोबर 2023 पासून नवीन बदल केला आहे. TDS बाबत काही समस्या असल्यास या नवीन नियमाने ती सहज सोडवली जाऊ शकते.CBDT ने ऑगस्ट 2023 मध्ये इलेक्ट्रॉनिक फॉर्म 71 जाहीर केला होता. जर तुमचा टीडीएस चुकीच्या वर्षात कापला गेला असेल, म्हणजे उत्पन्न दुसर्‍या एखाद्या वर्षी दाखवले गेले असेल आणि दुसर्‍या वर्षी टीडीएस कापला गेला असेल, तर काळजी करण्याची गरज नाही.या फॉर्मद्वारे चुकीच्या वर्षात कापला गेलेला टीडीएसमध्ये सहज बदल करता येणार आहेत. यासाठी आयकर कायदा 1962 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. मात्र, सध्या फक्त गेल्या 2 वर्षांसाठीच ही सुधारणा करण्यात आली आहे.

इलेक्ट्रॉनिक फॉर्म 71 बाबत
फॉर्म 71 फक्त इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मिळू शकेल. सबमिशनसाठी डिजिटल स्वाक्षरी आवश्यक असेल. यासोबतच इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोडही आवश्यक असेल.

प्राप्तिकर साइटवरून फॉर्म 71 डाउनलोड करावा लागेल.

  • फॉर्ममध्ये आपल्याला नाव, पॅन, पत्ता, उत्पन्न, वर्ष, कोणत्या वर्षी TDS कापला गेला, किती TDS कापला गेला, आपण TDS चा दावा का करत आहोत अशी माहिती भरावी लागेल.
  • नंतर स्वाक्षरी करा आणि सबमिट करा.
  • जसे आपण आयटीआर पडताळणी करतो अगदी त्याच पद्धतीने या फॉर्मची देखील पडताळणी करावी लागेल.यासाठी डिजिटल स्वाक्षरी आवश्यक असेल.
  • यानंतर, तुमचा दावा योग्य असल्यास तुमचे पैसे परत करण्यात येतील.

SL/KA/SL

12 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *