खांद्यावर नांगर ठेवून शेती करणे हे व्हिजन महाराष्ट्र का…

मुंबई दि ३ — शेतकऱ्याला खांद्यावर नांगर घेऊन शेत नांगरावे लागत आहे हे व्हिजन महाराष्ट्र आहे का असा सवाल या शेतकऱ्यांच्या समस्यांवरील चर्चेची सुरुवात करताना भास्कर जाधव यांनी केला. मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाने कोकणात आंबा आणि उन्हाळी भाताचं मोठं नुकसान झालं आहे, मासेमारी देखील लवकर बंद करावी लागली. मधल्या काळात पाऊस अचानक बंद झाला, कोकणात दुबार पेरणी शक्य होत नाही त्यामुळे या सगळ्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
अशा शेतकऱ्यांना धीर देण्याऐवजी कृषिमंत्री त्यांची चेष्टा करतात अशी टीका करत शेतकऱ्यांनी आपल्या मुलांची लग्न करायची नाहीत का असा सवाल जाधव यांनी केला . शेतकऱ्याला मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्या बापामुळे म्हणजेच पंतप्रधान मोदी यांच्या कडून मिळतात अशी भाषा बबनराव लोणीकर करतात, ते कोणाच्या जीवावर असा प्रश्न उपस्थित करत कष्टकरी शेतकऱ्याचा सन्मान करणे का विसरतात , सत्ताधाऱ्यांनी नम्र असले पाहिजे हे ते विसरले का असा सवाल ही जाधव यांनी यावेळी केला. ML/ML/MS