विदर्भाच्या विकासाशी प्रश्नांना विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात प्राधान्य
नागपूर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विदर्भाच्या विकासाशी निगडीत प्रश्नांना नागपूर येथे होणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात प्रामुख्याने प्राधान्य देण्यात येणार असून कामकाजाचा एक संपूर्ण दिवस विदर्भाच्या विकासासाठी चर्चेत आणणार असल्याची माहिती विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज नागपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.Issues related to Vidarbha’s development will be given priority in the winter session of the Legislature
विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या तयारी संदर्भात विधानसभेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे यांच्यासोबत विविध विभागाचे अधिकारी पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर आढावा घेतल्यानंतर विधानभवन नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मागील 2 वर्षापासून कोविडमुळे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होऊ शकले नाही. त्याच अनुषंगाने गर्दीची संख्या लक्षात घेता कामकाजाच्या दिवशी मर्यादित पास उपलब्ध केल्या जातील तसेच या अधिवेशनात केंद्रीय पद्धतीवर आधारित बारकोड प्रणाली वापरून विधानमंडळ परिसरात प्रवेशासाठी पासेस वितरीत केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत चर्चा करूनच विधीमंडळ परिसराच्या जवळील जागा नवीन कार्यालयासाठी अधिग्रहित होतील यासाठी सुद्धा चर्चा झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.
आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार सर्व नियम पाळली जाणार असून स्थानिक जनतेला अधिवेशन दरम्यान वाहतुकीची समस्या उद्भवणार नाही याची सुध्दा वाहतूक विभागाला सूचना करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
जनतेचे प्रश्न घेऊन येणाऱ्या प्रतिनिधी साठी योग्य सोईसुविधा मिळावी यासाठी विधीमंडळ प्रयत्नशील असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही याबद्दल आवश्यक त्या सूचना संबंधित विभागांना दिली असल्याची माहिती विधानपरिषद उपसभापती डॉ.निलमताई गोऱ्हे यांनी दिली.
१०००० पोलीस कर्मचारी, १०० ते ५०० गाड्या यांच्या नियोजनावरील खर्चाची चर्चा झाली आहे. तसेच १ डिसेंबर पर्यंत विधानमंडळातील सोईसुविधेची सर्व माहिती संबंधित विभाग आम्हाला पुरवित रहाणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिला आमदारांची सुरक्षा लक्षात घेऊन आमदार निवासात संपूर्ण काळजी घेण्यात आली असून विधानसभा अध्यक्ष यात विशेष काळजी घेत आहे.
महिलांच्या प्रश्नासंदर्भात नागपूर विधानमंडळात कायमस्वरूपी कार्यालय स्थापित व्हावे यासाठी सुद्धा आपण आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर शहरात किमान १६०० मीडीया माध्यमकर्मी असून विधानमंडळाच्या जवळच मंडप उभारून सभागृहातल्या सर्व सोई उपलब्ध करून देण्यात येतील तसेच विधीमंडळाचे कामकाज जनतेला कळावे यासाठी मीडियाने आग्रही रहावे असे आवाहन त्यांनी केले.Issues related to Vidarbha’s development will be given priority in the winter session of the Legislature
ML/KA/PGB
15 Nov .2022