मानवाला अवकाशात पाठवण्यासाठीच्या ISRO च्या संशोधनाला मोठे यश

 मानवाला अवकाशात पाठवण्यासाठीच्या ISRO च्या संशोधनाला मोठे यश

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ISRO ने मिशन गगनयानच्या माध्यमातून मानवाला अवकाशात पाठवण्याची मोठी कामगिरी हाती घेतली आहे. इस्रो वेगवेगळ्या टेक्नोलॉजीवर काम करत आहे. आता त्यांच्या शास्त्रज्ञांच्या हाती यश मोठ लागलं आहे. इस्रोने CE20 Cryogenic Engine साठी आवश्यक एक कठीण सी-लेवल टेस्ट पूर्ण केली आहे. त्यानंतर इस्रो मानवाला अवकाशात पाठवण्याच्या मिशनच्या अजून जवळ आला आहे.

इस्रोने 29 नोव्हेंबरला तामिळनाडूच्या महेंद्रगिरी येथील इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्समध्ये ही टेस्ट केली. या टेस्टमध्ये क्रायोजेनिक इंजिन रि-स्टार्ट करुन पाहण्यात आलं. ही टेस्ट गगनयान मिशनसाठी खूप आवश्यक आहे. मानवी मिशनसाठी क्रायोजेनिक इंजिन आवश्यक आहे. Launch Vehicle Mark-3 (LVM-3) ला अपर स्टेजमध्ये पावर मिळते. मानवाला अवकाशात पाठवण्याची मोहीम यामुळेच यशस्वी होईल.

CE20 क्रायोजेनिक इंजिनचा विकास स्वत: इस्रोने केला आहे. लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटरने हे इंजिन डेवलप केलय. हे इंजिन 19 टनाच थ्रस्ट लेवल ऑपरेट करु शकते. आतापर्यंत या इंजिनने सहा एलवीएम-मिशन यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. अलीकडेच या इंजिनला अपडेट करुन 20 टन कॅपेसिटीच बनवण्यात आलं आहे. गगनयान मिशनमध्ये हे इंजिन वापरण्यात येईल. आता हे 22 टनापर्यंत वाढवण्यात आलं आहे. मानवाला अवकाशात पाठवण्यासाठी क्रायोजेनिक इंजिन अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

SL/ML/SL

13 Dec. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *