ISRO चे आदित्य एल १ करणार आज होणाऱ्या सूर्यग्रहणाचा अभ्यास

 ISRO चे आदित्य एल १ करणार आज होणाऱ्या सूर्यग्रहणाचा अभ्यास

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज होणारे सूर्यग्रहण हे २०२४ वर्षातील पहिले सूर्यग्रहण आहे. आज होणाऱ्या सूर्यग्रहणादरम्यान, सूर्य पूर्णपणे चंद्राच्या सावलीने झाकोळला जाणार आहे. यावेळी सूर्याच्या कडा दिसणार आहे. या दरम्यान, इस्रोचे आदित्य एल१ यान या संपूर्ण सूर्यग्रहणाचा अत्यंत जवळून साक्षीदार होणार आहे. आदित्य L1 हे या काळातील या ग्रहण टिपणार असून या द्वारे सूर्याचे क्रोमोस्फियर आणि कोरोनाचा अभ्यास हे यान करणार आहे.

आजचे संपूर्ण सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. संपूर्ण सूर्यग्रहण हवाई, पॉलिनेशिया, उत्तर अमेरिका, मध्य अमेरिका, ग्रीनलँड, आइसलँड यांसारख्या देशात दिसणार आहे. भारतीय वेळेनुसार सोमवारी रात्री ९:१२: वाजता सूर्यग्रहण सुरू होणार आहे. त्यानंतर, सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार दुपारी २:२२ वाजता संपेल. एवढेच नाही तर यंदाचे सूर्यग्रहण भारतातूनही दिसणार आहे. वृत्तानुसार, या वर्षीचे दुसरे सूर्यग्रहण २ ऑक्टोबर रोजी होणार आहे. हे पॉलिनेशिया, पश्चिम मेक्सिको, दक्षिण अमेरिकेचा दक्षिण भाग, अंटार्क्टिका, दक्षिण जॉर्जिया यांसारख्या भागांमधून पाहिले जाऊ शकते.

योगायोगाने, आदित्य-L1 लॉन्च झाल्यानंतर चार महिन्यांनी या वर्षी ६ जानेवारी रोजी Lagrange Point 1 (L1 Point) हे यान पोहोचळे. पृथ्वीपासून १.५ दशलक्ष किलोमीटर दूर असलेल्या लॅग्रेंज पॉइंटवरून सूर्याचे निरीक्षण करणे आणि सूर्याची माहिती गोळा करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. या सौर यानात एकूण सहा उपकरणे आहेत.

अहवालानुसार, आदित्य L1 वर असलेल्या ६ पेलोडपैकी २ उपकरणांचा वापर करून या सूर्यग्रहणाचे निरीक्षण केले जाणार आहे. इस्रोचे आदित्य एल १ यान व्हिजिबल एमिशन लाइन कोरोनाग्राफ आणि सौर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप वापरून ४ मिनिटांचे होणाऱ्या या सूर्यग्रहणाचा अभ्यास करणार आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *