ISRO चे १०० वे प्रक्षेपण यशस्वी

बंगळुरु, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ISRO ने आज शंभराव्या रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करून नवा विक्रम केला आहे. बंगळुरुच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरून इस्त्रोने आज जीएसएलव्ही-एफ १५ या रॉकेटचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले. अवकाश तळावरून आज सकाळी ६ वाजून २३ मिनिटांनी हे रॉकेट अवकाशात झेपावले.
इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी देशातच क्रायोजेनिक तंत्रज्ञानावर आधारित जीएसएलव्ही-एफ १५ रॉकेटने पूर्व नियोजनानुसार एनव्हीएस-०२ हा उपग्रह पृथ्विच्या लंब वर्तुळाकार कक्षेत यशस्वीरित्या स्थापित केला.या वर्षांतील इस्त्रोचे हे पहिले अवकाश प्रक्षेपण यशस्वी झाले आहे. उपग्रह नियोजित कक्षेत यशस्वीपणे स्थापित करण्यात आला आहे, अशी घोषणा इस्त्रोचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी केली.
इस्रोने सांगितले की NVS-02 जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये ठेवण्यात आले आहे. हा उपग्रह नेव्हिगेशन प्रणालीचा एक भाग आहे, जी भारतातील GPS सारख्या नेव्हिगेशन सुविधा वाढविण्यासाठी डिझाइन केलेली आहे. ही प्रणाली काश्मीर ते कन्याकुमारी, गुजरात ते अरुणाचलपर्यंतचा भाग कव्हर करेल. यासोबतच किनारपट्टीपासून १५०० किमीपर्यंतचे अंतरही कव्हर केले जाईल. यामुळे हवाई, सागरी आणि रस्ते प्रवासासाठी उत्तम नेव्हिगेशन मदत मिळेल.
SL/ML/SL
29 Jan. 2025